esakal | रोहित पवार यांनी नगरसाठी दिले ६०० लिटर सॅनीटायझर, अडीच हजार चष्मे
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar gave the city six hundred liters of sanitizer

आमदार रोहित पवारांनी सामाजिक बांधीलकी जपत आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनादेखील मदतीचा हात दिला आहे.यासाठी २० हजार लिटरपेक्षा अधिक सॅनीटायझरचे वाटप करण्यात येत आहे.त्यांच्याकडुन होत असलेल्या मदतीने कोरोनाच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी हातभार लागणार आहे

रोहित पवार यांनी नगरसाठी दिले ६०० लिटर सॅनीटायझर, अडीच हजार चष्मे

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड:  जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना राज्यातील अनेक भागातही कोरोनाचा थैमान वाढू लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडुन कर्जत-जामखेडसाठी प्रतिबंधक उपाययोजना  सुरू आहेत. मास्क, सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

सोशल डिस्टंन्स ,समाज जनजागृतीमधुनही नवनवीन उपाय योजना राबवण्यात येत आहेत. एकट्या कर्जत-जामखेडसाठीच नाही तर नगर जिल्हा आणि संपूर्ण राज्यात त्यांनी ही उपायोजना सुरू केली आहे.

कर्जत-जामखेड बरोबरच आमदार रोहित पवारांनी आता नगर जिल्ह्याच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे.आमदार रोहित पवार व बारामती ॲग्रो लिमिटेडच्या मदतीने नगर जिल्ह्यासाठी मोफत ६०० लिटर सॅनीटायझर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाथी १००० चष्मेदेखील जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पोहोच करण्यात आले आहेत.

आणखीही काही मदत लागल्यास सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. कर्जत येथील प्रशासकीय अधिकारी,पोलिस अधिकारी कर्मचारी,आरोग्य विभागाला १००० हजार व जामखेडसाठी देखील १००० चष्मे देण्यात येत आहेत. कोरोनापासून बचावासाठी सॅनीटायझरची राज्यभरातुन मागणी होत आहे. 

सॅनिटायझरचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मात्र, बारामती समुहाच्या वतीने ही अडचण लक्षात घेता सॅनीटायझरची निर्मिती करण्यात येत आहे. कोरोनापासून राज्यातील जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच या संकटातून बाहेर निघण्यासाठी बळ देतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक

रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यासाठीही सहाशे लिटर सॅनीटायझर दिले आहे. या उपक्रमाबद्दल त्यांनी  आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले आणि आभारही मानले.

राज्यासाठीही २० हजार लिटरहून अधिक सॅनीटायझर
आमदार रोहित पवारांनी सामाजिक बांधीलकी जपत आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनादेखील मदतीचा हात दिला आहे. यासाठी २० हजार लिटरपेक्षा अधिक सॅनीटायझरचे वाटप करण्यात येत आहे.त्यांच्याकडुन होत असलेल्या मदतीने कोरोनाच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी हातभार लागणार आहे.लॉकडाऊन सुरू असताना त्यांचे सुरू असलेले 'वर्क फ्रॉम होम' कौतुकास्पद आहे.