esakal | लॉकडाऊन ः रोहित पवारांचा कर्जत-जामखेडमधील रस्ता पेंटिंग पॅटर्न ओरिसातही
sakal

बोलून बातमी शोधा

ROHIT PAWAR PENTING

कोरोना विषाणूचे चित्र त्याखाली पेंटिंग केलेले आहेत.या  संदेशामुळे नागरिकांना आपण घरातून बाहेर पडायचं नाही याची खबरदारी घेण्याची सूचना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. 

लॉकडाऊन ः रोहित पवारांचा कर्जत-जामखेडमधील रस्ता पेंटिंग पॅटर्न ओरिसातही

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : जामखेडमध्ये कोरोनाबाधित पाच व्यक्ती सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरीचा पवित्रा घ्यावा म्हणून  प्रशासन व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहेत. मानवी कवटी आणि हाडकांची डेंजर असलेली पेटिंग सर्वांनाच सावधान करीत आहे.

जनजागृतीसाठी निरनिराळे 'फंडे ' राबवून लोकांची जनजागृती करीत आहेत. याचा प्रत्यय निरनिराळ्या उपक्रमांमधून पहायला मिळतो आहे. आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील सर्व गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करिता औषध दिले आता जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर जनजागृतीचे संदेश देणारे ' पेंटिंग ' करुन  कोरोनापासून संरक्षण करण्याकरिता नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

जामखेड शहरात सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क इतरांशी येऊ नाही याकरिता लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नाही याकरिता रस्त्यावर पेटींग करुन संदेश देण्याच्या फंडा आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून हाती घेतला आहे. जामखेडमधील बीड रस्ता, नगर रोड, तपनेश्वर रोड, खर्डा रोड, करमाळा रोड, कर्जत रोड व इतर प्रमुख रस्त्यावर 'घरात राहूया, कोरोना टाळूया आम्ही बाहेर येणार नाही, कोरोना घरी घेऊन जाणार नाही. आपण खरंच कामासाठी घराबाहेर पडत आहेत का ? विनाकारण बाहेर फिरत असाल तर आपलं कुटुंब, शहराला आपण थोडक्यात धोक्यात आणत आहात, असे निरनिराळे संदेश पेंटिंगच्या माध्यमातून दिले  आहेत.

तसेच कोरोना विषाणूचे चित्र त्याखाली पेंटिंग केलेले आहेत.या  संदेशामुळे नागरिकांना आपण घरातून बाहेर पडायचं नाही याची खबरदारी घेण्याची सूचना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. 

कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांचा पॅटर्न ओरिसातही वापरला जात आहे. सोशल माध्यमात दोन्हीकडील चित्रे टाकून दावा केला जात आहे.