
सांगली-जिल्ह्यात एकही करोनाग्रस्त रूग्ण आढळलेला नाही. परंतू हा आजार पसरू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच दहा मोठ्या रूग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे नियोजन केल्याची माहिती आरोग्य समिती सभापती आशा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
.
त्या म्हणाल्या, ""चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरामध्ये करोना हा विषाणूमुळे होणारा आजार डिसेंबर 2019 मध्ये पसरला. तेथून हा आजार अनेक देशात पसरला आहे. हा आजार भारतात पसरू नये म्हणून चीन देशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवाशांचे विमानतळावर स्क्रिनिंग होत आहे. सांगली जिल्ह्यात परदेशातील 30 प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी सहा प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यांना घरी सोडले आहे. तर उर्वरीत 24 प्रवाशांना त्यांच्या घरात 14 दिवसासाठी विलगीकरण करून ठेवले असून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दररोज तपासणी होत आहे. आजअखेर जिल्ह्यात एकही करोनाग्रस्त रूग्ण आढळला नाही.''
त्या पुढे म्हणाल्या, ""जिल्ह्यात परदेशातून आलेल्या पाच प्रवाशांची नावे राज्य सरकारकडून मिळाली आहेत. तीन गावात ते राहत असून त्यांचा शोध सुरू आहे. करोनाग्रस्त संशयित रूग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी दहा मोठ्या रूग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी सांगली व मिरज सिव्हील आणि भारती हॉस्पिटलमध्ये कक्ष स्थापन केला आहे. तसेच संशयित रूग्णांसाठी सेवासदन, वानलेस हॉस्पिटल, प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर, सिद्धीविनायक मिरज, आदित्य मल्टिस्पेशालिटी, कुल्लोळी हॉस्पिटल, श्वास हॉस्पिटल येथेही कक्ष स्थापन केले जाऊ शकतात. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास आणखी तीन ठिकाणी सोय करता येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.''
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यावेळी उपस्थित होते.
दक्षता घ्या-
सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास, मुत्रपिंड निकामी होणे, अतिसार आदी करोनाची लक्षणे आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्वसनाचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकटचा सहवास टाळा. हस्तांदोलन टाळा. साबणाने हात स्वच्छ धुवा. अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा असे आवाहन डॉ. गिरीगोसावी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.