esakal | बेळगावात भाषिक अल्पसंख्याक शाळांना दिलासा ; रोष्टरचे संकट लवकरच होणार दुर
sakal

बोलून बातमी शोधा

roshat problem released in belgaum for schools it's good news

भाषिक अल्पसंख्याक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रखडेल्या शिक्षक भरतीलाही गती मिळणार.

बेळगावात भाषिक अल्पसंख्याक शाळांना दिलासा ; रोष्टरचे संकट लवकरच होणार दुर

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक शाळांच्या मानगुटीवर बसलेले रोष्टर पध्दतीचे भुत लवकरच दुर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रखडेल्या शिक्षक भरतीलाही गती मिळणार असुन शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती दिली आहे. 

भाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांमध्ये 2010 पुर्वी रोष्टर पध्दत लागु नव्हती त्यामुळे जागा रिक्‍त जागा झाल्यानंतर संस्था त्या जागेवर शिक्षकांची नेमणूक करत होती. परंतु सरकारने रोष्टर पध्दतीनुसार शिक्षक भरती करावी अशी सुचना केल्याने अनेक संस्थासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत काही संस्थानी न्यायालयात धाव घेत रोष्टर पध्दत रद्द करावी यासाठी याचीका दाखल केली होती. त्यानंतर याबाबत निर्णय देताना 2012 मध्ये उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षक भरतीत रोस्टर लागू करु नये असा आदेश दिला आहे. तरीही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. 

हेही वाचा - आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर अचानक आले शाळेच्या पटांगणावर अन्

काही दिवसांपुर्वी आमदार शहापूर यांनी विधान परिषदेत रोष्टर पध्दतीवर आवाज उठविला होता. तसेच अल्पसंख्याक शाळांमध्ये रोष्टर पध्दतीमुळे शिक्षक भरतीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला यश येताना दिसून येत आहे. अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षक भरतीत रोस्टर लागू करु नये, तसेच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना त्यांचा अधिकार द्यावा अशी सूचना केली आहे. या न्यायालयाच्या आदेशबाबत सेवानियमांर्तगत अभिप्राय मागवण्यात आला आहे. याचा अहवाल लवरकच येणार आहे. अशी माहिती शिक्षण मंत्र्यानी दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत रोष्टरबाबतचा अंतीम निर्णय येऊन कामयस्वरुपी शिक्षक करण्यास मदत होईल असे मत व्यक्‍त होत आहे. 
 
मराठीसह इतर भाषिक अल्पसंख्याक संस्थाच्या शाळांमध्ये 10 वर्षांपासुन रिक्‍त झालेल्या जागांवर शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे कायमस्वरुपी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांसाठी रोष्टर पध्दत लवकर दुर होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अंतीम निर्णय लवकर घ्यावा असे अनेकांमधुन व्यक्‍त होत आहे.

संपादन - स्नेहल कदम