नादुरुस्त रस्ते सिमेंटचे होणार 

The rough roads will be of cement
The rough roads will be of cement
Updated on: 

नगर : महानेट प्रकल्पामार्फत ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी दिली जात आहे. या कामादरम्यान नगर तालुक्‍यात अनेक रस्ते खोदण्यात आले. या प्रकरणी पंचायत समितीने गुन्हा दाखल करण्याचा ठराव केला. त्यानंतर महानेट प्रकल्पाच्या ठेकेदाराने सर्व खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देऊ, असे पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सांगितल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. 


राज्यातील 13 हजार ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी "महानेट' (भारत नेट- दुसरा टप्पा) प्रकल्पामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. महानेटच्या जोडणीसाठी नगर तालुक्‍यातील पारगाव (भातोडी), सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा आदी गावांत तीन किलोमीटरचे रस्ते खोदले आहेत. 


याबाबत "महानेट'ने पंचायत समितीला, तसेच जिल्हा परिषदेला कोणतीच पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत "महानेट'वर गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला होता. त्यानंतर महानेट प्रकल्पाच्या ठेकेदाराने नगर पंचायत समितीशी संपर्क केला. बुधवारी (ता. पाच) पंचायत समितीची बैठक झाली. बैठकीत महानेटच्या ठेकेदाराने उपस्थित राहून तालुक्‍यातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून देऊ, असे सांगितले. पण हे काम करताना डांबर उपलब्ध नसल्याने आम्ही खोदलेल्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करून देऊ, असे सांगितले. खोदलेले रस्ते दुरुस्त होत असल्यामुळे मासिक सभेत महानेटवर गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणे हा आमचा मूळ उद्देश होता. तो सफल झाल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 
- रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com