कर्नाटकातील पाचव्या लॉकडाऊनची काय आहे मार्गसूची 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोनाव्हायरस नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा रविवारी पूर्ण झाला. केंद्र सरकारने जारी केल्यानुसार पाचव्या टप्प्याची 1 जून ते 30 जून दरम्यान अंमलबजावणी होणार असून राज्य सरकारकडून याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

बंगळूर: कोरोनाव्हायरस नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा रविवारी पूर्ण झाला. केंद्र सरकारने जारी केल्यानुसार पाचव्या टप्प्याची 1 जून ते 30 जून दरम्यान अंमलबजावणी होणार असून राज्य सरकारकडून याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने 1 जूनपासून लॉकडाऊन 5.0 चा रोडमॅप जाहीर केला आहे. शनिवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. हा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत सुरू राहणार असून टप्याटप्याने टाळेबंदी शिथील केली जाईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले. 

सरकारने 8 जूनपासून मंदिर, मशिद आणि चर्चला परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्‌स आणि इतर गेस्ट हाऊस 8 जूनपासून पुन्हा सुरू होतील. मात्र जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली नाही. 
थिएटर, मेट्रो ट्रेन, जिम, जलतरण तलावांना परवानगी नसून पुढील परिस्थितीच्या आधारे निर्णय घेण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे. केंद्र मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) शिथील करण्यात आली आहे. 1 ते 30 जूनपर्यंत रात्रा 9 ते सकाळी 5 या वेळेत कर्फ्यू असणार आहे. 

सरकारने लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारांसाठी 20 लोकांची मर्यादा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन 30 जूनपर्यंत कंटेंन्मेट झोनमध्ये सुरू राहील. जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कंटेंन्मेट झोन निश्‍चित केले जाणार आहेत. कंटेंन्मेट झोनमध्ये केवळ अत्यावश्‍यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. 

8 जूनपासून या गोष्टी खुल्या 

* सर्व धार्मिक केंद्रे 
* मॉल 
* हॉटेल, रेस्टॉरंट 
* परिवहन बस आणि खासगी वाहनांची वाहतूक 
* वाहन, कॅब रहदारी 

8 जून नंतरही यावर बंदी 

* मेट्रो रेलची वाहतूक नाही. 
* चित्रपटगृह, जिम सेंटर 
*सार्वजनिक जलतरण तलाव, सभागृह कार्यरत नाही. 
* शाळा व महाविद्यालय व इतर प्रशिक्षण केंद्रे 
* कोणतेही सार्वजनिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, खेळ, करमणूक, धार्मिक मेळावे नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: route of the fifth lockdown in Karnataka