बार्शीतील साधना कन्या प्रशाळेची केरळ पुरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयांची मदत

सुदर्शन हांडे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

या संकल्पनेला सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठा प्रतिसाद देत निधी गोळा केला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कार्य पाहून संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सोमाणी व सर्व संचालक मंडळाने जमा केलेल्या निधीत स्वतःचा निधी जमा करून केरळ पुरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयांचा निधी दिला आहे.

बार्शी : येथील श्रीराम विवेक वर्धिनी मंडळ संचालित शेठ मुळंचह व जवारमल साधना कन्या प्रशाला मुलींच्या शाळेने राष्ट्रीय आपत्ती केरळ मधील पुरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सोमाणी यांच्याहस्ते ही मदत तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उज्वल सोमाणी, संचालक द्वारकदास सोमाणी, डॉ.निनाद माढेकर, नवल सोमाणी, प्राचार्य नेताजी सोलवट, मुख्याध्यापिका विनीता काळे, शोभा संचेती, विद्या बोधले, विकास वाघमारे, सुनील शिनगारे, उज्वला लाड, जयश्री गाढवे, महानंदा पाटील, विनायक माने आदी उपस्थित होते. केवळ मुलींसाठी असलेली ही शाळा उत्तम शिक्षण व विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द आहे. केरळ पूर ही राष्ट्रीय आपत्ती आहे. अशावेळी आपण काहींना काही मदत केली पाहिजे. तसेच मुलांनाही आशा संकट प्रसंगातून एकात्मतेचे शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने मुख्याध्यापिका विनिता काळे यांनी सर्वांनी निधी गोळा करण्याची संकल्पना मांडली होती. 

या संकल्पनेला सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठा प्रतिसाद देत निधी गोळा केला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कार्य पाहून संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सोमाणी व सर्व संचालक मंडळाने जमा केलेल्या निधीत स्वतःचा निधी जमा करून केरळ पुरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयांचा निधी दिला आहे. तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी साधना कन्या प्रशाला ही बार्शी शहरातील छोटीशी शाळा असूनही मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी निधी गोळा करून सहकार्य करत इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. इतर शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी केरळ पुरग्रस्तांसाठी निधी देण्याचे आवाहन केले आहे. 

लग्नाचा खर्च टाळून प्रा. विशाल गरड यांचा निधी तर सफाई कामगाराचा एक दिवसाचा पगार केरळसाठी - 
पांगरी (ता.बार्शी) येथील लेखक, चित्रकार व व्याख्याते प्रा. विशाल गरड यांनी स्वतःच्या लग्नाचा खर्च टाळून केरळ पुरग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे. तर बार्शी नगरपालिकेतील आरोग्य विभागात सफाई कामगार असलेले शाम लक्ष्मण शेंडगे यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार केरळ पुरग्रस्तांसाठी दिला आहे. 
 

Web Title: Rs fifty one thousand helps from Sadhana Kanya School for Kerala victims