महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी RT-PCR सक्ती शिथिल

यासंदर्भात सुधारीत आदेश बजावण्यात आला असून, निर्बंध शिथिल केले आहे.
RT-PCR
RT-PCResakal
Summary

यासंदर्भात सुधारीत आदेश बजावण्यात आला असून, निर्बंध शिथिल केले आहे.

बेळगाव : महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईहून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली होती. पण, यासंदर्भात सुधारीत आदेश बजावण्यात आला असून, निर्बंध शिथिल केले आहे. २ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्राची सक्ती उठवण्यात आली आहे.

RT-PCR
सरदार वली खान, सलीम पटेलचे काय संबंध? मलिकांनी केलं स्पष्ट

कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चेकपोस्टची उभारून आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्राची सक्ती केली होती. सुरवातीला कोरोनाचे दोन लस घेतलेल्यांसाठी प्रवेश मिळेल, अशी माहिती देण्यात आली होती. कालांतराने आदेशात सुधारणा करून कोविड लशीसोबत आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात दाखल होणाऱ्यांना अडचणी येत होते. शिवाय कोविडचे रुग्ण कमी व संसर्गामध्ये घट होऊनही राज्यात येण्यासाठी निर्बंध ठेवण्यात आले होते. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले.

चेकपोस्टवरील सक्ती उठवली जावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे. निर्बंध उठवण्यात आल्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेण्यात आला आणि याबाबतचा आदेश आज (९) देण्यात आला. यानुसार आदेशात २ किंवा दोन पेक्षा कमी कालावधीसाठी महाराष्ट्राहून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटीसीआर चाचणीची सक्ती हटवली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचणी संदर्भातील निर्बंध उठविताना काही नियम जारी केले आहेत. त्यात प्रवाशांना ताप, खोकला, सर्दी किंवा कोरोनाची लक्षणे असू नये. स्वयंप्रतिज्ञापत्र सादर करणे जरुरी आहे. चेकपोस्टच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग होणार असून, त्याला सहकार्य द्यावे. तसेच येताना कोविडचे २ डोस घेतल्याबाबचे प्रमाणपत्र सादर केले जावे.

RT-PCR
फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार

प्रवास करताना मास्क परिधान करण्यासह कोविड नियमावलीचे पाळले जावे. २ दिवसांत परत जाण्याबाबचे तिकीट सादर करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्राची सक्ती असणार नाही, असा उल्लेख आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या मुख्य सचिवांनी बजाविलेल्या आदेशाच्या पत्रात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com