हप्ता थकलायं; किमान प्रमाणपत्र द्या

- राजेश मोरे
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - साहेब कर्ज काढून नवीन वाहन घेतले आहे. पासिंगअभावी वाहन रस्त्यावर आणता येत नाही. ऐन मार्च एंडिंगच्या तोंडावर बॅंकेचा हप्ता थकला तर पत खराब होईल अगर वाहनही जप्त केले जाईल, याची धास्ती वाहनधारकांना लागून राहिली आहे. गाडीचे पासिंग तुम्ही कधीही करा, निदान त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एक प्रमाणपत्र तरी आम्हाला द्या... अशी मागणी वाहनधारकांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. 

कोल्हापूर - साहेब कर्ज काढून नवीन वाहन घेतले आहे. पासिंगअभावी वाहन रस्त्यावर आणता येत नाही. ऐन मार्च एंडिंगच्या तोंडावर बॅंकेचा हप्ता थकला तर पत खराब होईल अगर वाहनही जप्त केले जाईल, याची धास्ती वाहनधारकांना लागून राहिली आहे. गाडीचे पासिंग तुम्ही कधीही करा, निदान त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एक प्रमाणपत्र तरी आम्हाला द्या... अशी मागणी वाहनधारकांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मध्ये काही कामासाठी जायचे म्हटल तर सर्वसामान्यांना आता घाम फुटू लागला आहे. वाहन परवाना, रिक्षा, एसटी बॅच, वाहन नोंदणीपासून पासिंगपर्यंतची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहेत. त्यात सर्व्हर डाऊनपासून ना-ना तऱ्हेची विघ्ने येत आहेत. एजंटचा आधार घेऊनही कार्यालयात गेल्याबरोबर एकही काम तातडीने होईल, याची गॅरंटी आता देता येत नाही. कागदपत्रे पोस्टाने घरी येतील, मोबाइलवर मॅसेज्‌ येईल, अशा उत्तरांची कार्यालयाकडून मिळालेली माहिती घेऊन सर्वसामान्यांना घरी परतावे लागत आहे. 

आरटीओ कार्यालयात सध्या ‘‘वाहन ४.०’’ ही संगणक प्रणालीचे काम सुरू आहे. त्यासाठी वाहनांची नवीन नोंदणी, वाहनाचे हस्तांतर, बॅंक बोजा नोंद करणे उतरवणे आदी कामे संगणकात फिडिंग करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवली आहेत. 

सुशिक्षित बेरोजगारांकडून उपजीविकेसाठी सध्या प्रवासी अगर मालवाहतुकीला पसंती दिली जात आहे. बॅंका अगर फायनान्स कंपनीकडून तारण रिक्षा, ट्रक, टेंपो अशी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. खरेदीनंतर वाहनांची आवश्‍यक बांधणी करण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर वाहनांचे पासिंग झाल्याशिवाय ते रस्त्यावर आणता येत नाही; पण सध्या आरटीओ कार्यालयात पासिंगचे काम संगणक प्रणालीच्या कारणाने बंद आहे. वाहनधारकांना पासिंगसाठी १ मार्चलाच या, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नवे वाहन रस्त्यावर आणण्यासाठी वाहन बांधणीपासून पासिंगपर्यंत महिन्याचा कालावधी लागत आहे. कर्जाने घेतलेले नवी गाडी रस्त्यावरच आणता येत नसल्याने बॅंकांचा सुरवातीचाच कर्जाचा हाप्ता थकीत राहणार, अशी वाहनधारकांची परिस्थिती आहे. त्यातून त्यांची बॅंकांतील खराब होणारी पत आणि बॅंकेकडून वाहन जप्त करण्याची भीती वाढली आहे. 
 

हे तरी करा
पासिंग प्रक्रिया सुरू असल्याबद्दलचे प्रमाणपत्र द्या
प्रमाणपत्र असलेल्या वाहनांना व्यवसाय करण्याची मुभा द्या
कागदपत्रांची सद्य:स्थितीची माहिती देणारा कक्ष तयार करा

पासिंग कधीही करा मात्र...
आरटीओ कार्यालयाने नव्या वाहनांच्या नोंदणीसह पासिंगबाबत गांभीर्याने विचार करावा. तांत्रिक कारणाने पासिंग करण्यास विलंब लागत असेल तरी काही हरकत नाही, मात्र पासिंगची प्रक्रिया सुरू असल्याबद्दलचे एखादे प्रमाणपत्र वाहनधारकाला द्या. की त्याआधारे त्याला व्यवसाय करता येऊ शकेल, अशी मागणी वाहनधारकांतून जोर धरत आहे. 

Web Title: rto office work