
जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 30 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. दिवसभरात 21 जण कोरोनामुक्त झाले. तर वाळवा तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 30 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. दिवसभरात 21 जण कोरोनामुक्त झाले. तर वाळवा तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होत असून आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळत आहे. मात्र नागरिकांनी दक्षता नाही घेतली तर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असेही सांगण्यात येते. पोलिस आणि प्रशासनामार्फत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या 189 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये चौघे बाधित आढळले. तर ऍन्टीजेनच्या 1308 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 29 जण बाधित आढळले. एकूण 33 रुग्ण बाधित आढळले. त्यापैकी 30 जण जिल्ह्यातील तर तिघेजण परजिल्ह्यातील आहेत.
आजच्या 30 बाधितांमध्ये आटपाडी तालुक्यातील 4, जत 4, कडेगाव 1, कवठेमहांकाळ 1, खानापूर 4, मिरज 3, पलूस 1, तासगाव 3, वाळवा 2 आणि महापालिका क्षेत्रातील 7 रुग्णांचा समावेश आहे. शिराळा तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही. आज दिवसभरात 21 जण कोरोनामुक्त झाले. तर वाळवा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत 483 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 78 जण चिंताजनक आहेत. चिंताजनक रुग्णांपैकी 67 ऑक्सिजनवर आणि 11 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील चित्र-
आजअखेरचे बाधित रुग्ण- 46704
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 44527
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 483
आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1694
परजिल्ह्यातील मृत रुग्ण- 212
आजअखेर ग्रामीण रुग्ण- 23504
आजअखेर शहरी रुग्ण- 6906
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16294
संपादन : प्रफुल्ल सुतार