
जत : ‘‘जिल्ह्यातील शेवटचा मतदार संघ असलेला जत कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिवाय, राज्यकर्त्यांनी पाण्याचे आश्वासन देऊन हा भाग विकासापासून वंचित ठेवला. मात्र, रोजगार हमी योजनेमध्ये २६६ कामांचा समावेश आहे. यातून गावगाड्यातील गोरगरीब जनता, स्थलांतरितांना लखपती बनवण्यासाठी मनरेगा योजना यशस्वी ठरेल. यात काही त्रुटी, अटी, शर्ती असतील त्या देखील शिथील करू. जत तालुक्याच्या विकासासाठी हवा तितका निधी देऊ,’’ असा विश्वास रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे दिला.