सांगलीतील ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत रशियाचा  यु अलेक्‍झांडर ठरला विजेता...जगभरातून 2036 खेळाडूंचा सहभाग  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली-  बुद्धिबळ संघटक भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नूतन बुद्धिबळ मंडळाने घेतलेल्या ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत रशियाच्या आंतरराष्ट्रीयमास्टर यु अलेक्‍झांडरने 63 गुणांसह विजेतेपद पटकावले. 

सांगली-  बुद्धिबळ संघटक भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नूतन बुद्धिबळ मंडळाने घेतलेल्या ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत रशियाच्या आंतरराष्ट्रीयमास्टर यु अलेक्‍झांडरने 63 गुणांसह विजेतेपद पटकावले. 

वास्तुविशारद प्रमोद चौगुले, चिदंबर कोटीभास्कर, मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये, उदय पवार, कुमार माने, सौ. सीमा कठमाळे, आंतरराष्ट्रीयमास्टर समीर कठमाळे, बळीराम गवळी, श्रीमती माणिक पडसलगीकर, दीपक वायचळ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र, गोवा, पं. बंगाल, उत्तरप्रदेश, हरीयाणा, केरळ, तामिळनाडू तसेच स्पेन, सर्बिया, रशियासह 15 देशातील 2036 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर, चिदंबर कोटीभास्कर, श्रिया हिप्परगी, योगेश कुंभार यांच्यासह एक ग्रॅन्डमास्टर, 15 आंतरराष्ट्रीयमास्टर आणि एक हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. 

प्रत्येक खेळाडूस तीन मिनिटाचा वेळ याप्रमाणे सहा मिनिटाचा एक डाव याप्रमाणे 15 फेऱ्या खेळवण्यात आल्या. त्यामध्ये रशियाच्या आंतरराष्ट्रीयमास्टर यु अलेक्‍झांडरने विजेतेपद पटकावले. रशियाचाच आंतरराष्ट्रीयमास्टर ओलेग बद्मात्स्य्रेनोव याने 51 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. भारताचा आंतरराष्ट्रीयमास्टर सुब्रमण्यम ( तामिळनाडू) याने 49 गुणासह तिसरे, राजदीप सरकारने 49 गुणांसह चौथे, केरळच्या जुबीन जीमीने 48 गुणांसह पाचवे, कौस्तुव कुंडू (प.बंगाल) ने 48 गुणासह सहावे स्थान मिळवले. स्पेनच्या व्लादिमिर चेर्निकोवने 48 गुणासह सातवे, सर्बियाच्या ग्रॅन्डमास्टर दुसान पोपोविकने 47 गुणासह आठवे, उत्तरप्रदेशच्या अनमोल कुमारने 47 गुणासह नववे, रित्विज परबने 47 गुणासह दहावे स्थान मिळवले. 

सांगली जिल्हातील सौमील सारडा, त्रिशा राहटे, जीत सारडा, शर्विल येडेकर, श्‍लोक पारेख, सालोल सारडा, केशव सारडा, नंदन बजाज, नवीन करवडे, ऋषीकेश जाधव, सुधांशू पाटील यांनी विविध वयोगटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान मिळवला. श्रिया हिप्परगी हिला उत्कृष्ठ महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळाला. शार्दुल तपासे, अनंदिता प्रदीप, दिपक वायचळ यांनी काम पाहिले. स्पर्धेकरिता हरियाणा शतरज असोसिएशन, श्रेयस व सारंग पुरोहित, चिंतामणी लिमये, राजाभाऊ शिरगावकर, स्मिता केळकर, रमेश चराटे, कुमार माने यांचे सहकार्य लाभले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia's U Alexander wins online chess tournament in Sangli .2036 players from all over the world participate