आक्रमक ; जेव्हा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर डेप्युटी कलेक्टर यांच्या थेट केबिनमध्ये घुसतात अन्..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

फोनवरून झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तातडीने प्रांताधिकाऱ्यांना अहवाल देण्याचा आदेश दिला.

इस्लामपूर (सांगली) : साखराळे (ता. वाळवा) येथील जवानांच्या उपोषणप्रश्नी जिल्ह्यातील दोन आमदारांनी प्रांताधिकाऱ्यांना घेराओ घालत तासभर ठिय्या मारला. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले. काहींना त्याच गावठाणात जागा उपलब्ध करून दिली असताना या सैनिकांवर अन्याय का? असा आरोप यावेळी त्यांच्यावर झाला. यावेळी फोनवरून झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तातडीने प्रांताधिकाऱ्यांना अहवाल देण्याचा आदेश दिला.            

शासनाकडे पैसे भरून साखराळे येथील चार जवानांना जागा मंजूर केली होती, मात्र अचानक त्यांना ती जागा नाकारण्यात आल्याने त्यांनी प्रजासत्ताकदिनी उपोषण सुरू केले आहे. दोन्ही आमदार मोर्चाच्या निमित्ताने प्रांत कार्यालयात आले होते. 
तेव्हा उपोषणस्थळी त्यांनी भेट दिली. अन्‌ त्या सैनिकांच्या प्रश्नी थेट प्रांताधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये माजी सैनिकांसह पोहचले. ते उपस्थित नसल्याने त्यांना मोबाईलवरून संपर्क साधून बोलावण्यात आले. दरम्यान, तहसीलदार रवींद्र सबनीस कार्यालयात दाखल झाले. काही वेळेत प्रांताधिकारी दाखल झाले. तेव्हा दोन्हीही आमदारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. 

हेही वाचा - नोकरीसाठी मुलाखत देऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला अन् केली आत्महत्या

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadabhau khot and gopichand padalkar questioning to deputy collector in snagli