सद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी

अमोल वाघमारे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 171 व्या अखंड हरीनाम सप्ताह व साईबाबा समाधी शताब्दी निमित्त स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत शिर्डी (निमगाव) येथे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजीत करण्यात आले असुन आज रविवारच्या सुटीची पर्वणी साधत या कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली. साई प्रसादालया शेजारील परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

सावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 171 व्या अखंड हरीनाम सप्ताह व साईबाबा समाधी शताब्दी निमित्त स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत शिर्डी (निमगाव) येथे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजीत करण्यात आले असुन आज रविवारच्या सुटीची पर्वणी साधत या कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली. साई प्रसादालया शेजारील परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. प्रदर्शनामध्ये खाद्य पदार्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या कृषी अवजारांतून पाच दिवसात तब्बल लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे समजते. शेतकर्यांसाठी आयोजित आधुनिक शेती औजारे व कृषी मार्गदर्शनाने शेतकरी भारावून गेले होते.

प्रदर्शनात ट्रॅक्टर व शेती औजारे,वाहन महोत्सव,शेतीविषयक प्रक्रिया उद्योग,महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन,पशु पक्षी प्रदर्शन,दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री,तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान, सौर ऊर्जा विषयक दालने, सेंद्रीय शेती साठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहीती, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल व बियाणे विक्रीसाठी मोफत  स्टॉल, जगातील सर्वांत लांब 1फूट लांबीची देशी मिरची, देशी गायीच्या गोमूत्रा पासून 20 रु.पासून 20000 लिटर पर्यंतच्या घरच्या घरी औषध बनविण्याची प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोम्बी व 140 ते 150 दाणे तयार होणारी कुदरत 100 व 8 इंच लांबीची लोम्बी कुदरत 17 ही देशी बियाणे यांची माहिती व प्रदर्शन तसेच देशातील ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे, बी-बियाणे, खते, किटकनाशकांचा वापर याची माहिती शेतकरी स्टॉलवर थांबून घेत होते. या प्रदर्शनाला 15 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांनी भेट देवुन पहाणी केली.

सदर कृषी प्रदर्शनाची 23 ऑगस्टला समारोप होणार असुन या कृषी प्रदर्शनाला संपुर्ण महाराष्ट्रासह पर राज्यातील शेतकर्यांनी आता पर्यंत भेटी देवुन या भव्य कृषी प्रदर्शनाचा लाभ घेत आहे.

Web Title: Sadgaguru Shri Gangaagiri Maharaj harinam huge crowd of agricultural exhibitions