साई मंदिर बंद, तरीही बाबांची झोळी फुल्ल...

Sai temple closed, donation of Rs two crore online to Baba
Sai temple closed, donation of Rs two crore online to Baba
Updated on

शिर्डी : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर म्हणजे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. तरीही या काळात कालपर्यंत (ता. 3) साईभक्‍तांकडून ऑनलाइन एक कोटी 90 हजार 201 रुपये देणगी प्राप्त झाल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. 

डोंगरे म्हणाले, ""संस्थानतर्फे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवण संपूर्ण जगात पोचलेली आहे. त्यांचे भक्‍त देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहेत. 17 मार्चपासून मंदिर बंद ठेवले असूनही या काळात टाटा स्काय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल ऍपद्वारे थेट ऑनलाइन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घरबसल्या घेत आहेत.'' 

साईभक्‍तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरूच ठेवली आहे. 17 मार्च ते 3 एप्रिल 2020 या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाइनच्या माध्यमातून एक कोटी 90 हजार 201 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाल्याचे डोंगरे यांनी सांगितले. 

साईचरणी ऑनलाइन मिळालेली देणगी 
17 मार्च ः 4 लाख 4 हजार 825,18 मार्च ः 3 लाख 14 हजार 727,19 मार्च ः 8 लाख 30 हजार 238, 20 मार्च ः 2 लाख 39 हजार 505, 21 मार्च ः 3 लाख 91 हजार 963, 22 मार्च ः 3 लाख 61 हजार 406, 23 मार्च ः 4 लाख 97 हजार 345, 24 मार्च ः 3 लाख 3 हजार 37, 25 मार्च ः 5 लाख 35 हजार 592, 26 मार्च ः 6 लाख 59 हजार 27, 27 मार्च ः 6 लाख 79 हजार 330, 28 मार्च ः 5 लाख 7 हजार 391, 29 मार्च ः 4 लाख 80 हजार 313, 30 मार्च ः 4 लाख 50 हजार 150, 31 मार्च ः 13 लाख 17 हजार 213, 1 एप्रिल ः 5 लाख 74 हजार 199, 2 एप्रिल ः 12 लाख 56 हजार 234, 3 एप्रिल ः 2 लाख 84 हजार 462 (आकडे रुपयांत) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com