Sakal Impact : बेळगावात RCU कडून विद्यार्थ्यांना विषय बदलून मिळणार

विषय बदलून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांतूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
Rani Channamma University
Rani Channamma University sakal
Updated on

बेळगाव: राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदवीतील कन्नड विषय बदलण्यास विद्यार्थ्यांना फक्त दोन दिवसांची संधी दिली होती. त्यातही अनेक अडचणी आल्या. यासंबंधी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाने विषय बदलण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. ८) विषय बदलून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांतूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

Rani Channamma University
जामीनानंतर राणे कुटुंबियांकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'ही वेळ...'

‘सकाळ’च्या ५ रोजी अंकात कन्नड’ विषय बदलताना अडचणी या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. तसेच चन्नमा विद्यापीठाकडून सॉप्टवेअर बंद व मोजक्याच महाविद्यायांना संधी दिली जातेय. असाही उल्लेख करण्यात आला होता. या बातमीनंतर विद्यापीठाने मुदत वाढ केली होती. याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.

विद्यापीठाने पदवी शिक्षणात सक्ती असलेला कन्नड विषय बदलण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. तसेच बेळगाव शहरातील काही मोजक्याच महाविद्यालयाना ही संधी देण्यात आली. इतर महाविद्यालयांचे सॉफ्टवेअर विद्यापीठानेच बंद ठेवले होते. त्यामुळे त्या महाविद्यालयाना विषय बदलताना अडचणी आल्या. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे विषय बदलायचे सॉफ्टवेअर खुले करावे तसेच विषय बदलण्यासाठी आणखी दोन दिवस संधी द्यावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून केली जात होती. यासंबंधी ५ रोजी सकाळनेही बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल विद्यापीठाला घ्यावी लागली.

Rani Channamma University
Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरनानुसार राज्यातील पदवी महाविद्यालयात कन्नड विषय सक्तीचा केला होता. मात्र, न्यायालयाच्या सूचनेनुसार ती सक्ती मागे घेतली. राणी चन्नम्मा विद्यापीठाने देखील ही सक्ती मागे घेतली. त्यानंतर विषय बदलण्याची संधी देण्यात आली. बेळगाव शहरात मोजक्याच महाविद्यालयांना ही संधी दिली. ज्या महाविद्यालयांना विषय बदलण्याची संधी दिली. त्यांनी मंगळवारपर्यंत आपले विषय बदलून घेतले. यापूर्वी कन्नड विषयाची निवड विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे महाविद्यालयांनी देखील इंटरनल टेस्ट घेतल्या होत्या. आता विद्यार्थ्यांनी विषय बदलून घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा इंटरनल टेस्ट देण्याची शक्यता आहे.

परीक्षा कधी?

यंदापासून फक्त पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु केले आहे. पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेतले आहेत. यामुळे त्यांच्या परीक्षा लवकरच होतील. मात्र, पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून अध्यापही अर्ज भरणा करून घेतलेला नाही. यामुळे त्यांच्या परीक्षा कधी? हे विद्यापीठाने स्पष्ट करावे. अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Market
Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Marathi News Esakal
www.esakal.com