Sakal special : एक ते २० पटाच्या ३८५ शाळा

सव्वापाच हजार विद्यार्थी; शासन आदेश निघाल्यास शाळा कायमच्या बंद
school closed
school closedschool closed

सांगली : राज्यातील एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबतच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. या शाळा बंद करण्यात येतील, अशा शक्यतेने त्याला शिक्षक संघटनांचा विरोध सुरू झाला आहे. जिल्ह्यात वीसहून कमी पटसंख्या असलेल्या ३८५ शाळा आहेत. यामधून पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

२०१७ मध्ये भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात वीसहून कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी राज्यात अशा १३२४ शाळा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षक यांनी अशा शाळा बंद करण्यास विरोध केला होता. त्यामुळे हा निर्णय बारगळला.

शिक्षण विभागाने वीस पटाच्या आतील शाळांची माहिती संकलितच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच या शाळा बंद करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता असल्याने शिक्षक संघटनांनी या निर्णयाला जोरदार विरोध सुरू केला आहे. जिल्ह्यात वीस किंवा त्याहून कमी पटसंख्या असलेल्या ३८५ शाळा आहेत. या शाळांमधून ५२७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकपासून वीस पटसंख्येपर्यंतच्या शाळा आहेत. शिराळा तालुक्यात एक पटसंख्येची एक शाळा आहे, तर कडेगाव तालुक्यात दोन पटसंख्येच्या दोन शाळा आहेत. आटपाडी तालुक्यात तीन पटसंख्येच्या तीन शाळा आहेत.

वाडी-वस्तीवर शाळांची संख्या अधिक

वीस पटसंख्येच्या आतील शाळा या बहुतांश ग्रामीण भागात वाडी-वस्तीवरील आहेत. दुर्गम भागात काही शाळा आहेत. त्यामुळे या शाळांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्याचा निर्णय घेतला तरी या विद्यार्थ्यांना तेथे जाणे शक्य होईल का, हा प्रश्न आहेच. शिवाय या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीही आहे. त्यामुळे या निर्णयाला पालक आणि शिक्षकांचाही विरोध वाढण्याची शक्यता आहे.

मराठी माध्यमाच्या ३४७ शाळा

एक ते वीस पटसंख्येच्या आतील मराठी माध्यमाच्या ३४७ शाळा आहेत, तर कन्नड माध्यमाच्या ३०, उर्दू माध्यमाच्या आठ शाळा आहेत. यामध्ये कन्नड माध्यमाच्या तीस शाळा जत तालुक्यातील आहेत. उर्दू माध्यमाच्या आठ शाळांमध्ये जत तालुक्यातील चार आणि कवठेमहांकाळ, कडेगाव, वाळवा व मिरज तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा आहे.

जपानमध्ये होते; महाराष्ट्रात का नाही?

जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन दुर्गम भागात आहे. तेथे प्रवासी संख्या कमी झाल्याने स्टेशन बंद करण्याचा निर्णय जपान रेल्वेने घेतला होता. मात्र या गाडीने काना हाराडा नावाची मुलगी शाळेला जाते, असे रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ही गाडी सुरू ठेवली. २०१६ मध्ये या मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही गाडी बंद केली. एका मुलीच्या शिक्षणासाठी जपान रेल्वे एक गाडी सुरू ठेवते, तर महाराष्ट्रात वीस पटाच्या आतील शाळा का सुरू ठेवता येणार नाहीत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com