
लेंगरे (सांगली) - खानापुर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेले लेंगरे गाव या गावाला अनेक कारणामुळे नावलौकीक मिळाला आहे.यामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य असणारा पीर कलंदर दर्गा,लोकनेते कै.निवृत्ती बागल,माजी सभापती जालिंदर शिंदे यांंच्या सारख्या समाजाभिमुख नेतृत्वामुळे लेंगरे गावची प्रचिती सर्वत्र परिचित आहे.यातच आणखी एक भर पडली आहे.ती म्हणजे येथील उद्योजक अशोक मोरे यांची कन्या डाँ. रविषा मोरे हिच्यामुळे हि सध्या पुण्यातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असणार्या नायडू हाँस्पिटल मध्ये विनामुल्य बजावत आहे.कोरोनाग्रस्तांच्या करत सेवेमुळे तीच्या धैर्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
लेंगरेतील युवा उद्योजक मोरे यांना एक मुलगा,एक मुलगी त्यांनी मुलीचे सवप्न पुर्ण करण्यासाठी मेहनत घेत मुलगी रविषाला डाँक्टर केले.यात त्यांना त्याच्या पत्नी रेखा मोरे यांची मोलाची साथ लाभली.रविषाचे डाँक्टरकीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर अनुभवासाठी पुण्यातील रुबी दवाखान्यात अतिदक्षता विभागात सेवा करण्यास सुरुवात केली होती.पुढे पुढच्या शिक्षण पुर्ण करण्यासाठी रुबी दवाखान्यातील सेवा थांबवत.एम.डी शिक्षण सुरु ठेवले.
सध्या देशासह राज्यात कोरोनाचे सावट वाढले आहे.यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय सेवा करण्यार्यानी समोर येऊन कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे यासाठी आवाहन केले होते.यातूनच पुणे महापलिका आयुक्तांनी अशा डाँक्टरची मदतीसाठी पावले उचलली.
डाँ.रविषा हिला नायडू हाँस्पिटल मध्ये कोरोनाबाधित रुगणांवर उपचार करण्यासाठी विचारणा करण्यात आली.रविषाने हि कोरोनाची परिस्थिती पाहता सेवा देण्यासाठी होकार दिला.परंतु आईला रविषाचा हा निर्णय मान्य नव्हता.सध्या राज्यातील कोरोनाची महामारीची स्थिती पाहता कोणतीही आई आपल्या मुलीला अशा रुगणांच्या सेवेला पाठवणार नाही.यामुळेच या सेवेसाठी आईने विरोध दर्शवला होता. परंतु मुळात गावच्या मातीतच सामाजिक कार्याच्या बिज रुजले असल्याने रविषाने लाँकडाऊनमुळे गावी अडकलेल्या वडिलांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.मुलीचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता नायडू हाँस्पिटल मध्ये सेवा करण्यास परवानगी देत समाजाप्रती,देशाप्रती असणारे कर्तव्य पार पाडण्यास सांगितले.रविषाच्या आईची समजुत काढत मुलीच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.गेल्या एक महिन्यापासून रविषा सरोजिनी नायडू दवाखान्यात अतिदक्षता विभागात कोरोनाग्रस्तांची सेवा शासनाकडून कोणताही मोबादला न घेता सेवा बजावत आहे.
रविषाचे आई,वडील आणि अशा लहान वयात समाजिक जाणीव जपणार्या रविषाचे सर्वत्र कौतुक केलच पाहिचे कारण डॉक्टर,पोलिस,परिचारिका त्याचे सर्व सहकारी जीवाची पर्वा न काम करतात.परंतु त्यांना प्रोत्साहन देणारे त्याचे आई,वडीलांंची भुमिकाही इतर लोकांना प्रेरणादायी ठरण्यास मदतच होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.