पराक्रमी सरदार शहाजी शिंदेची समाधी या गावात अखेरच्या घटका मोजतेय... 

हिरालाल तांबोळी
Sunday, 19 July 2020

घाटनांन्द्रे (सांगली)-  विजापूर-गुहागर राष्ट्रीय मार्ग क्र.266 वरील बोरगांव(ता. कवठेमहंकाळ) येथील कोड्याचे माळ म्हणून प्रसिद्ध व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या कलावंतीणच्या कोड्याचे स्थळाचे रस्ता बांधकाम कंत्राटदाराने डागडुगी व सुशोभितकरण केले. त्याच धर्तीवर दिघंची-हेरवाड राज्यमार्गावरील कुंडलापुर (ता.कवठेमहांकाळ) गावाजवळील पराक्रमी सरदार शहाजी शिंदे यांची समाधी सुशोभित करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळीचे जवळचे नातलग असणारे सरदार शहाजी शिंदे यांची समाधी सध्या अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या समाधीचेही डागडुजी व सुशोभितकरण कंत्राटदाराने करावे, अशी मागणी कुंडलापुर सोसायटीचे अध्यक्ष दिपक चव्हाण व निवृत शासकीय अधिकारी अनिल पाटील आणि इतिहासप्रेमी नागरिकांनी केली आहे. 

सध्या विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे व दिघंची-हेरवाड या राज्य मार्गाचे काम चालू आहे. विजापूर-गुहागर मार्ग क्रंमाक 266 वर बोरगांव 
(ता.कवठेमहंकाळ)च्या माळावरील कलावतींणच्या कोड्याचे स्थळाचे रस्ता बांधकामच्या कंत्राटदाराने डागडुगी व सुशोभितकरण केले. त्याच धर्तीवर दिघंची-हेरवाड या राज्यमार्गावरील कुंडलापुर (ता.कवठेमहंकाळ) येथील पराक्रमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळीचे जवळचे नातलग शहाजी शिंदे यांच्या उपेक्षित, दुर्लक्षित व अखेरची घटका मोजत असलेल्या समाधीस्थळाचेही दिघंची-हेरवाड राज्य महामार्गाच्या रस्ता बांधकाम कंत्राटदाराने डागडुगी व सुशोभिकरण करण्याची मागणी होत आहे. बोरगांवच्या माळावरील ऐतिहासिक कलावंतीणच्या कोड्याच्या स्थळाला डागडुगी व सुशोभितकरण केल्यामुळे सध्या ते आकर्षणाचे, विरंगुळयाचे आणि कुतूहलाचे असे जणू पर्यटनस्थळ बनले आहे. त्याच धर्तीवर कुंडलापूर येथील ऐतिहासिक समाधीचे पूनर्जीवन केल्यास ह्या वास्तुमुळे घाटमाथा व तालुक्‍याचे एक आकर्षण ठरेल. पुरातन इतिहास जिवंत रहाण्यास मदत होईल. आज या वास्तूच्या इमारतीवरील संपूर्ण प्लॅस्टर नष्ट झाले आहे. सर्व चिराही निखळल्या आहेत. वास्तुचा बराच भाग झाडाझुडपाच्या विळख्यात अडकून निकामी होऊ लागला आहे. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या समाधी स्थळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथे शिलालेखावरील मोडी अक्षरे, चौथारे, गावकुस(तट), सतीचा हाताची शिळा, गावच्या वेशीचे अवशेष अशा ऐतिहासिक पाऊलखुणा त्या पहावयास मिळतात. पण या जाज्वल पराक्रमाची साक्ष देणारी वास्तु मात्र आज आखेरची घटका मोजत आहे. या वास्तुकडे प्रशासन,पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ती नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. नाईलाजास्तव ग्रामस्थ, इतिहासप्रेमी,नागरिक शहाजी शिंदेच्या समाधी वास्तूची डागडुगी,सुशोभितकरणची मागणी रस्ता बांधकाम कंत्राटदाराकडे करू लागले आहेत. 
 
संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Samadhi of the mighty Sardar Shahaji Shinde is counting the last elements in this village ...