संभाजी भिडे म्हणाले, कोण सांगितले मला पुणे जिल्हा बंदी...

Sambhaji Bhide Comment On Bhima Koregaon Incidence Sangli Marathi News
Sambhaji Bhide Comment On Bhima Koregaon Incidence Sangli Marathi News
Updated on

सांगली - भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्या दिवशी इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी मी उपस्थित होतो. निष्कारण मला गोवले जात असून बदनामीचा हा कट आहे. यामागे दुष्टबुद्धी मग ती बारामतीची की तेरामतीची मला माहित नाही. पुणे जिल्हा बंदीची मला कोणतीही नोटीस मिळाली नाही. तेथे जाण्यासाठी सध्या कोणताही नियोजित कार्यक्रम नसल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्यावतीने सोमवारी (ता.30) सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात श्री. भिडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

भीमा- कोरेगावला जाण्याचे माझे नियोजन नाही

यावेळी श्री. भिडे यांना भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बंदी घातली असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ""तेथील दंगलीशी माझा कोणताच संबंध नाही. मी तेथे गेलोच नाही. निष्कारण मला गोवले आहे. माझ्या बदनामीचा हा कट आहे. जिल्हा बंदीबाबत मला कोणतीही माहिती नाही. तसेच नोटीस मिळाली नाही. दुर्बुध्दीने हा प्रकार केला जात आहे. सध्या तरी माझे तिकडे जाण्याचे नियोजन नाही. या प्रकरणामुळे दुष्टबुद्धी कार्यरत असून ती बारामतीची की तेरामतीची मला माहित नाही. त्याचा आता पत्रकारांनीच शोध घ्यावा.'' 

ती नावे संभाजी ब्रिगेडची

भिडे पुढे म्हणाले, ""भीमा कोरेगाव येथील कार्यक्रम हा देशभक्तीहीन दृष्टी असलेला म्हणावा लागेल. त्यात कसलेही तथ्य नाही. दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी टीव्हीवर बोलताना नावे वाचून दाखवली. ती नावे संभाजी ब्रिगेडनी दिली होती.'' 

नोटीसीबाबत आम्हाला माहिती नाही

कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, ""पुणे जिल्हा बंदीची नोटीस काढल्याचे आम्हाला माहित नाही. तसेच कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. प्रसिद्धी माध्यमांकडे ती असेल तर त्यांनी प्रसिद्ध करावी. एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून फंडींग होत असताना माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना अद्याप अटक केली नाही. गुरूजींची मात्र बदनामी केली जाते. त्यामुळे ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी राहिली. गडकोट मोहिमेनंतर संबंधितांच्या मागे लागू.'' 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com