esakal | व्हिडिओ : संजय राऊतांना पदावरून हटवा, अन्यथा.. संभाजी भिडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji bhide demand for suspended to sanjay raut his post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना तत्काळ पदावरून मुक्त करावे. अन्यथा  महाराष्ट्रभर जिल्ह्या-जिल्ह्यातून बंदचे आवाहन केले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रभर याविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिला आहे. 

व्हिडिओ : संजय राऊतांना पदावरून हटवा, अन्यथा.. संभाजी भिडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली  :  छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज 
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने आज (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना तत्काळ पदावरून मुक्त करावे. अन्यथा  महाराष्ट्रभर जिल्ह्या-जिल्ह्यातून बंदचे आवाहन केले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रभर याविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिला आहे. 

हे पण वाचा - अबब... तो लाल कोंबडा मुलांचा पाठलाग करतो आणि... -

राऊत यांनी उदनराजे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवप्रतिष्ठानने देखील खासदार राऊत यांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण सांगली जिल्हा बंद ठेवून राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना भिडे म्हणाले, ""छत्रपती उदयन महाराज यांच्याबद्दल संजय राऊत यांनी उद्‌गार काढून अपमान केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. हा अपमान केवळ छत्रपती उदयन महाराज यांचा नसून छत्रपती परंपरेचा आहे, त्यामुळे राऊत यांच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत  बंद राहील.