संभाजी भिडें यांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

संभाजी थोरात
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भिडे यांनी भेट घेतली.

कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भिडे यांनी भेट घेतली.

भिडे आणि मंत्री पाटील यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमागचे कारण समजू शकले नाही. या दोघांनीही त्याबाबत बोलण्यास नकार दिला.

दरम्यान भिडे यांचा लक्षतीर्थ वसाहत येथे रविवारी ( ९ डिसेंबरला) कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी ते आज कोल्हापूरात आले असल्याचे समजते.

Web Title: Sambhaji Bhide meets Chandrakant Patil in Kolhapur