esakal | Video - कोरोना नाहीच; त्यामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji bhide statement on corona criticised state and central government in sangli

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

Video - कोरोना नाहीच; त्यामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, 'केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही.'

हेही वाचा - लॉकडाउनविरोधात सांगलीकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

दरम्यान, आम्ही सांगलीकर या फलकाखाली आणि भाजपच्या नियोजनात आज सांगलीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शेखर माने आदी सहभागी झाले. त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. या बैठकीत संभाजीराव भिडे हे मास्क न लावता बसले होते.

loading image