esakal | महाडिकांच्या भाजप प्रवेशाने संभाजीराजे अस्वस्थ
sakal

बोलून बातमी शोधा

महाडिकांच्या भाजप प्रवेशाने संभाजीराजे अस्वस्थ

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर घेतलेले खासदार संभाजीराजे यांची अस्वस्थता वाढली आहे. मुंबईत रविवारी (ता. १) झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सूचक वक्‍तव्यामुळे त्यांची नाराजी दिसून येत आहे.

महाडिकांच्या भाजप प्रवेशाने संभाजीराजे अस्वस्थ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर घेतलेले खासदार संभाजीराजे यांची अस्वस्थता वाढली आहे. मुंबईत रविवारी (ता. १) झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सूचक वक्‍तव्यामुळे त्यांची नाराजी दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीच्या स्पर्धेत माजी खासदार महाडिक हेही होते, पण स्थानिक नेते व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांनाच उमेदवारी दिली.

स्वच्छ प्रतिमा, शाहू महाराजांच्या घराण्याचा वारसा, काम करण्याची धमक असलेला उमेदवार असूनही त्यांचा पराभव झाला. त्यात महाडिक गटाची मदत त्यांना झाली नसल्याचा आरोप त्यावेळी झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी तर एका कार्यक्रमातच यासंदर्भातील गौप्यस्फोट केला. तेव्हापासून महाडिक यांच्यापासून संभाजीराजे चार हात लांबच आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अजूनही माझी जखम भळभळते, असे सांगत त्यांनी महाडिक यांच्याविरोधात प्रचार केला. 

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार लोकांपर्यंत पोहचवणे, ही माझी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलेली नाराजी ही कशासाठी? हा प्रश्‍न मात्र राजकीय क्षेत्रात चर्चेला आला आहे.

टाळ्यांचा कडकडाट
मुंबईत मराठा समाजाच्या एका मेळाव्यात संभाजीराजे यांनी अप्रत्यक्षरीत्या नाराजी बोलून दाखवली. केलेले काम लोकांपर्यंत सांगण्यात काँग्रेस कमी पडली, ही वेळ अजूनही हातातून गेलेली नाही, या संभाजीराजे यांच्या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर आपले वडील काँग्रेसमध्ये, लहान बंधूही काँग्रेसमध्येच आहेत, माझेही मन कुठे रुळते हे तुम्हाला ठाऊक आहे, असे सांगत त्यांनी आपली खदखदच व्यक्त केली.

loading image
go to top