ज्यांना विरोध केला त्याच गलाई बांधवांनी गावकऱ्यांना दिला प्राणवायू...ऑक्‍सिजन मशिन्स देत आपत्तीत जपली माणुसकी 

सचिन निकम
Thursday, 24 September 2020

लेंगरे (सांगली)- कोरोना महामारीमुळे राहणीमानाचे संपुर्ण गणितच बदलले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गावात एक बाधीत रूग्ण सापडला तर अख्खे गावच्या गाव बंद केले जात होते. लोक बाधीत रूगणाकडे त्यांच्या कुटूंबाकडे द्वेष भावानेने पहात होते. बाहेरून येणा-या लोकांच्याकडे कोरोना घेऊन आलाय अशा संशयाने पाहिले जात होते. खानापुर,आटपाडी भागात येणा-या गलाईबांधवांच्याकडे अशाच नजरेने पाहिले जात होते. दुरदेशी अडकलेले गलाईबांधव आपल्या मायभूमीकडे येण्यासाठी धडपडत होते. गावाकडे येण्यासाठी नेत्याला फोन लावत त्याला विनंती केली जात होती. गावाकडे येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण लोक त्यांना टाळत होते. ना नेते,ना गाववाले,ना पै पाहुणे जवळ घेत होते. दुजाभावाची वागणूक देऊनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांसाठी देवदूत बनले आहे. अडचणीत असणाऱ्या गावाकडील मंडळीना ऑक्‍सिजन मशिनचे साहित्य देऊन माणुसकी जपली आहे

लेंगरे (सांगली)- कोरोना महामारीमुळे राहणीमानाचे संपुर्ण गणितच बदलले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गावात एक बाधीत रूग्ण सापडला तर अख्खे गावच्या गाव बंद केले जात होते. लोक बाधीत रूगणाकडे त्यांच्या कुटूंबाकडे द्वेष भावानेने पहात होते. बाहेरून येणा-या लोकांच्याकडे कोरोना घेऊन आलाय अशा संशयाने पाहिले जात होते. खानापुर,आटपाडी भागात येणा-या गलाईबांधवांच्याकडे अशाच नजरेने पाहिले जात होते. दुरदेशी अडकलेले गलाईबांधव आपल्या मायभूमीकडे येण्यासाठी धडपडत होते. गावाकडे येण्यासाठी नेत्याला फोन लावत त्याला विनंती केली जात होती. गावाकडे येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण लोक त्यांना टाळत होते. ना नेते,ना गाववाले,ना पै पाहुणे जवळ घेत होते. दुजाभावाची वागणूक देऊनही हेच गलाईबांधव गावकडच्या लोकांसाठी देवदूत बनले आहे. अडचणीत असणाऱ्या गावाकडील मंडळीना ऑक्‍सिजन मशिनचे साहित्य देऊन माणुसकी जपली आहे. 

पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनाच्या आपत्ती काळात याच गलाईबांधवांचा गावाकडे येण्यासाठी श्वास गुदमरला जात होता. त्यावेळी गावकडील मंडळी त्यांच्या वाटा अडवून उभे होते. आज तेच गलाईबांधव गावाकडच्या लोकांचा श्वास बनू पहात आहेत. गावाकडची स्थिती कोरोनाची भयावह बनत चालली हे ऐकून गलाई बांधव चिंतेत होते. ऑक्‍सीजन अभावी आपल्या गावाकडचे लोक मरू नयेत, त्यांची सोय व्हावी, त्यांना ऑक्‍सीजन मिळावा नगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरसाठीही काही गलाईबांधवांनी मदत केली आहे. विटा ग्रामिण रूग्णालयास मदत करत आधार दिला. 

सध्या गलाईबांधवांचा व्यवसाय अडचणीत आहे. तरीही ते गावाच्या व आपल्या लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. लॉककाळात परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून कोणीही आपल्या गावात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या बाहेर रस्ते खोदून तसेच रस्त्यावर ती मोठी झाडे पाडून रस्ते बंद केले होते. सुरुवातीच्या काळात कोरोना विषयी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. गलाई बांधव विषयी देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बाहेरून आलेले लोक आपल्या गावात कोरोना पसरवतील या भीतीने अनेक गावाच्या या लोकांना प्रवेश बंदी केली होती. त्याच गलाई बांधवानी कोव्हीड सेंटर,ग्रामीण रुगणालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधिताचे श्वास बनले आहे. 

प्राणवायू आपल्या दारी- 
विटा बचाव समितीचा आर्दश घेत लेंगरेतील लेंगरे बचाव समितीनेही सहा मशीन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोकसहभागातुन घेतल्या आहेत. ज्या लोकांना ऑक्‍सिजन ची गरज आहे.ज्यांना रुगणालयात बेड उपलब्ध होत नाही,अश्‍या लोकांना डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्यांच्या घरी ऑक्‍सिजन लावण्यात येईल असे समितीचे सदस्य हर्षवर्धन बागल यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The same Galai brothers who opposed them gave oxygen to the villagers. Humanity saved by disaster by giving oxygen machines