जि. प. फारशी घोटाळा : फरशीच्या खाली वापरलेली वाळूही चोरीची

The sand used under the floor was also stolen : Sangalil ZP tiles scam
The sand used under the floor was also stolen : Sangalil ZP tiles scam
Updated on

सांगली ः जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसवण्यात आलेल्या "थर्ड क्‍लास' फरशीच्या खाली वापरण्यात आलेली वाळू चोरीची असल्याचे उघडकीस झाले आहे. या दहा ब्रास वाळूच्या खरेदी, जीएसटी आणि रॉयल्टीची एकही पावती जोडलेली नाही. गंमत म्हणजे येथे फरशीवर फरशी बसवली आहे, असा आरोप आहे. तो सिद्ध झाल्यास हा दुहेरी घोटाळा ठरणार आहे. 

या प्रकरणी लिंगनूर (ता. मिरज) येथील श्री गणेश मजूर सोसायटीचा हा प्रताप बांधकाम विभागाला अडचणीत आणणारा ठरणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी या प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्याचा खुलासा मागवला आहे.

हा जिल्हा परिषदेतील फरशी घोटाळा "सकाळ'ने उजेडात आणला. श्री. गुडेवार यांनी त्या प्रकरणात आता "बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल' पद्धतीने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गंमत म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात दुहेरी घोटाळ्याच्या दिशेने तपास सुरु झाला आहे. 

गणेश सोसायटीला काढलेल्या नोटीसनुसार, त्यांनी बलभीम अर्थ मुव्हर्स, सांगली यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीची दहा ब्रास वाळू खरेदी केली आहे. येथील कामाची व्याप्ती पाहता इथे दहा ब्रास वाळू लागली कशाला? हाही मोठा प्रश्‍न आहे. याच फर्मला 20 हजार 400 आणि 25 हजार रुपयांची रक्कम रोखीत दिली गेली आहे.

शिवाय, ही वाळू चोरीची असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरीकडे याच सोसायटीने रंग, काच, लागूड आदीची खरेदी केल्याच्या सर्व पावत्या आणि त्या-त्या फर्मचे तपशील मागवण्यात आले आहेत. 

या संपूर्ण प्रकरणात सावगावे हे नाव चर्चेत आहे. गणेश सोसायटीने एस. एन. सावगावे यांना सात लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. या व्यक्तीला कशाच्या आधारे ही रक्कम दिली, याचा तपशील मागवण्यात आला आहे. या सोसायटीने सिद्धनाथ सोसायटीकडून फरशी खरेदी का केली, याचाही खुलासा करावा लागणार आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com