

Forest department premises where sandalwood trees were allegedly cut and stolen.
sakal
कुपवाड : वन विभागाच्या आवारामधून झालेल्या चंदन वृक्षांच्या चोरीस काही दिवसांत महिना पूर्ण होतोय. अद्यापही अनोळखी चोरट्यांचा शोध लागला नाही. तपासाची संथ गतीने सुरू आहे. तपासी वन विभागाचे वनपाल सुधीर सोनवणे यांच्याकडून लवकरच सीसीटीव्ही फुटेज तपासू, कारवाई करू, एवढेच उत्तर मिळते. मात्र, वीसहून अधिक दिवस उलटूनही नेमके काय तपासले, याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस माहिती मिळत नाही.