
-अजित कुलकर्णी
सांगली : रोज सुमारे हजार सपाट्या...सकाळी चार तास, सायंकाळी तीन तास घामाचा चिखल होईपर्यंत सराव...पाच किलोमीटर धावणे...हजारभर बैठका अशी दिनचर्या असणारा कंठी (ता. जत) येथील सुपुत्र संदीप मोटे तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’चा आखाडा गाजवणार आहे. पाच वर्षांच्या तपश्चर्येतून त्याने आत्मसात केलेले डाव-प्रतिडाव आता पणाला लावण्यासाठी तो सज्ज झाला आहे. २ फेब्रुवारीअखेर अहिल्यानगर येथे रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चमचमणारी गदा खांद्यावर घेण्यासाठी त्याने जीवतोड मेहनत घेतली आहे.