सांगली : लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीची जिल्ह्यात ठणठणाट

सांगलीला गरज साडेसात लाखाची; ४५ हजार लसींची उपनवारी
लाळ खुरकूत
लाळ खुरकूत sakal
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यातील पशुधनासाठी ७ लाख ३७ हजार लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसमात्रांची मागणी खात्याकडे केली. परंतु अद्याप सांगली जिल्ह्याला संबंधित कंपनीकडून लस पुरवठाच झालेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लस पुरवठ्यामधून आज अखेर ४५ हजार लसमात्रा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून घेतल्या आहेत. लाळ खुरकूत रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर,बाधित गावांमध्ये नियमित औषधोपचार करण्यात येत आहेत. तसेच रोगाचा प्रसार नजीकच्या गावांमध्ये होऊ नये यासाठी अन्य जिल्ह्यामधून उपलब्ध करून घेतलेल्या लसमात्रांचा वापर लसीकरणासाठी करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम ही योजना केंद्र शासनाने संपूर्ण देशभरमिशन तत्वावर लागू केली असून सन २०१९-२०२० पासून पुढील १० वर्षांच्या कालावधीकरिता राबविण्याचे निशचित केले आहे. सन २०२४-२०२५ पर्यंत लाळ खुरकूत आणि बृसेल्ला या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण साध्य करणे आणि सन २०२९-२०३० पर्यंत या दोन्ही रोगांचे उच्चाटन करणे हे उद्दिष्ट आहे. या मोहिमेची हिली फेरी १ सप्टेंबर २०२० ते दि.१० डिसेंबर २०२० अखेरच्या फेरीमध्ये जिल्ह्यामधील गाय वर्ग व म्हैस वर्गातील लहान व मोठ्या ५० हजार २२४ जनावरांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण आले.

लाळ खुरकूत
शिक्षक समाजपरिवर्तनाचे सर्वश्रेष्ठ माध्यम : हर्षवर्धन पाटील

पॉईटर...

* जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, मिरजेतील एक्स रे मशिन बंद

* यंदा ७ लाख ३७ हजार लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीसाठी पाठपुरावा

* गतवर्षी ५० हजार २२४ जनावरांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com