Sangali: पूरग्रस्तांसाठीचे पॅकेज फसवे : चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

पूरग्रस्तांसाठीचे पॅकेज फसवे : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने दुप्पट-तिप्पट भरपाई दिली. मात्र हे सरकार दुपटी पेक्षाही कमी मदत देत आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सांगलीत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेनेला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना, आघाडी सरकारला मात्र आपण शुभेच्छा देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली.

हेही वाचा: बारामती : भरधाव चारचाकी कार उंडवडीत घुसली; चार जण जखमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर के दहा हजार कोटींच्या पॅकेजवर टीका करताना ते म्हणाले, दहा हजार कोटींचे जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे. २०१९ च्या जीआर प्रमाणे मदत देण्याची सगळ्यांची मागणी होती. २०१९ मध्ये सरसकट शेतीची नुकसान भरपाई दिली होती. पण हे सरकार अजून पंचनाम्याचे तुणतुणे वाजवत आहेत. या पॅकेजमध्ये रस्त्यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. फडणवीस सरकारने नऊ हजार कोटी फक्त पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दिले होते. त्यामुळे महा विकास आघाडी सरकारचे पूरग्रस्त पॅकेज फसवे आहे, अशी टीका पाटील यांनी आघाडी सरकारवर केली.

गेंड्याच्या कातडीचे सरकार

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटक व सुटकेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे आता आरोपी झाले आहेत. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर एखादा मंत्री आरोपी झाल्यानंतर राजीनामे देतात. मात्र या सरकारमध्ये धनंजय मुंडे, अनिल परब, जितेंद्र आव्हाड यांचा असा समज झाला आहे, की सर्व सामान्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय आहे. त्यामुळे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे, अशी टीका आघाडी सरकारवर केली आहे.

loading image
go to top