लेसरचा झगमगाट ठरू शकतो घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेसर

लेसरचा झगमगाट ठरू शकतो घातक

सांगली : मिरवणुकांमध्ये झगमगाट आणण्यासाठी लेसर किरणांचा केला जाणारा वापर अलिकडच्या काळात धोकादायक ठरू शकतो. लेसर किरणांमुळे रात्रीच्या वेळेस झाडांवरील पक्ष्यांचा डोळ्यांना इजा होऊ शकते. २० ते ४० वॅट क्षमतेच्या लेसर किरणांपुढे मोबाईल कॅमेऱ्याची लेन्स खराब होण्याचे प्रकार यापूर्वी घडलेत. तसेच मिरवणुकीपुढे नाचणाऱ्यांच्या डोळ्यांना देखील धोका आहे. त्यामुळे लेसरचा मारा करताना सावधान...! असे म्हणावे लागेल.

गेल्या १५ ते २० वर्षांत उत्सवातील मिरवणुकांचे स्वरूप बदलत चालले आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकांबरोबर अलिकडच्या काळात ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभ्या करून आवाजाचा दणदणाट केला जातोय. त्याच्या जोडीने डोळे दिपवणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशझोताचा मारा केला जातोय. तसेच सध्या डोळे दिपवणारा झगमगाट आणण्यासाठी लेसर किरणांचा मारा सभोवती केला जातोय. लेसरचा वापर वैद्यकीय क्षेत्रात विविध उपचारांसाठी केला जातो. परंतु अलिकडे त्याचा वापर चार भिंतींच्या बाहेर आणला आहे.

Web Title: Sangali Laser Flash Can Be Dangerous

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..