
Shirala: शिराळा तालुक्यातील तीन ठिकाणी केल्या घरफोडीत प्रकरणी शिराळा पोलिसांनी प्रथमेश अमित जाधव (वय२४,धंदा मजुरी रा. शिराळा व करण नंदकुमार सातपुते (वय २६) धंदा खाजगी नोकरी रा. खेड या दोघांना अटक केली आहे.त्यांच्याकडून ६,३३,७६६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.याबाबत गुंगा शंकर डफळे (वय ५०) रा. मानेवाडी- वाकुर्डे बुद्रुक यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या चोरीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या नुसार पोलीस तपास करत आहेत.