क्रांतिभूमीतील दोन शास्त्रज्ञ जगातील टॉप दोन टक्क्यांत

‘स्टॅनफोर्ड’चे सर्वेक्षण; बागणीचे डॉ. सावंता माळी, किल्लेमच्छिंद्रगडचे डॉ. दीपक डुबल यांचा झेंडा
क्रांतिभूमीतील दोन शास्त्रज्ञ जगातील टॉप दोन टक्क्यांत
क्रांतिभूमीतील दोन शास्त्रज्ञ जगातील टॉप दोन टक्क्यांतsakal

नवेखेड : ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या तुकोबांच्या अभंगाला साजेशी कामगिरी करीत वाळवा तालुक्यातील काकाचीवाडीचे सुपुत्र डॉ. सावंता माळी व किल्लेमच्छिंद्रगडचे डॉ. दीपक डुबल यांना त्यांच्या संशोधनाच्या जोरावर जगातील टॉप दोन टक्के शास्त्रज्ञांत स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने हे सर्वेक्षण केले आहे. या दोघांचे नाव जागतिक स्तरावर गणले जाणार, ही तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

तशी दोनही खेड्यातील शेतकऱ्यांची मुलं. डॉ. माळी यांचे वडील शेतकरी आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश खेचून आणले. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण वाळवा तालुक्यातच झाले. वारणेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बीएस्सी पदवी संपादन केली. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी पदवी मिळवली प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळवली. त्यांच्या प्रबंधाला ‘जगातील सर्वोत्कृष्ट प्रबंध’ (बेस्ट थिसिस इन द वर्ल्ड) हा पुरस्कार मिळाला. २०१३ पासून ते दक्षिण कोरिया येथे चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या नामांकित जर्नलमध्ये त्यांचे २२५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. माळी यांनी सामान्यांना परवडेल अशा पेर्वोस्काइट सौरघटाची निर्मिती केली आहे. हा सौरघट अधिकतम कार्यक्षमतेचा असून जास्त काळ ऊर्जा पुरविणारा आहे.

क्रांतिभूमीतील दोन शास्त्रज्ञ जगातील टॉप दोन टक्क्यांत
मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वीच अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या...

डॉ. डुबल यांचे वडिलांचे छत्र लहानपणी हरपले. पुढे आईने जिद्दीने शिकविले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. कृष्णा महाविद्यालयातून १२ वी, तर पदार्थविज्ञानमधून बीएस्सी पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी मिळवल्यानंतर डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या अडीच वर्षांत ‘एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस’ या विषयात पीएचडी केली. पुढे त्यांनी दक्षिण कोरिया, जर्मनी, स्पेन या देशात संशोधनाचे कार्य केले.

सध्या ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या नामांकित जर्नलमध्ये त्यांचे ३०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. संशोधनावर १० हून अधिक पेटंट मिळवले आहेत. नुकत्याच झालेल्या एडी सायंटिफिक सर्वेक्षणातदेखील जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. डुबल यांचे नाव गणले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com