Sangli News : साडेपाच लाख नागरिकांनी केला भक्तियोगाचा विक्रम; वर्ल्ड बुक रेकॉर्डस् इंडिया, एशिया वर्ल्ड बुक रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली नोंद

सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आज शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर वारकरी तालावर भक्ती योग उपक्रम घेण्यात आला.
sangli 5.5 Lakh Citizens Set Record in Devotional Yoga
sangli 5.5 Lakh Citizens Set Record in Devotional Yogasakal
Updated on

सांगली - टाळ, मृदंगाच्या निनादात, विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती योगात सांगलीकर तल्लीन झाले. सुमारे साडे पाच लाखावर नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते.

या उपक्रमाची वर्ल्ड बुक रेकॉर्डस् इंडिया, एशिया वर्ल्ड बुक रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. या संस्थांच्या वतीने विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना प्रदान करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com