सांगलीत सहा पोलिसांसह 70 जणांना कोरोनाची लागण 

विष्णू मोहिते
Friday, 24 July 2020

सांगली,  ः जिल्ह्यात आज नव्याने 70 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यात महापालिका हद्दीत कोरोनाचे 57, तर ग्रामीण भागात 13 रुग्ण सापडले. महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर आजही सुरूच राहिला. यात सांगली, कुपवाडमध्ये 40 आणि मिरजेतील 17 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 40 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही. 

सांगली,  ः जिल्ह्यात आज नव्याने 70 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यात महापालिका हद्दीत कोरोनाचे 57, तर ग्रामीण भागात 13 रुग्ण सापडले. महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर आजही सुरूच राहिला. यात सांगली, कुपवाडमध्ये 40 आणि मिरजेतील 17 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 40 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही. 

जिल्हा पोलिस दलातील एका उपनिरीक्षकासह सहा पोलिस कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन कर्मचारी आणि आटपाडी पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी अशा सहा जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने खळबळ उडाली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक सात रुग्ण सापडले. त्यात आटपाडीतील पाच, तर लेंगरेवाडीतील एकाचा समावेश आहे. पलूस तालुक्‍यात नव्याने तीन रुग्ण सापडले. त्यात ब्रह्मनाळ येथील एक आणि बांबवडे येथील दोघांचा समावेश आहे.

कवठेमहांकाळ व नागज येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मिरज तालुक्‍यातील भोसे येथे एकाला लागण झाली. मिरज शहर पोलिस ठाण्यातील एका महिला सहायक निरीक्षकास "कोरोना' झाल्याचे सोमवारी (ता. 20) स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सर्वांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर आज आणखी सहा पोलिस "पॉझिटिव्ह' आले. महापालिकेतर्फे "ऍन्टीजेन' चाचणी मोहीम तीन-चार दिवसांपासून सुरू आहे.

शहर, ग्रामीण पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची ही चाचणी करण्यात आली होती. चाचणीत ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वाहतूक शाखेकडील दोन कर्मचारी बाधित असल्याचे स्पष्ट झाले. 
आटपाडी पोलिस ठाण्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी ठाण्यात कार्यरत असलेले बनपुरी, नागज येधील दोघांसह तिघांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाचा शिरकाव झाल्यावर गेले चार महिने पोलिस अहोरात्र बंदोबस्तावर आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पोलिस दलाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

 
मुख्यालयात क्वारंटाइन सेंटर 
मुख्यालयातील देवगिरी इमारतीत क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहेत. याशिवाय, प्रत्येक 48 तासांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. दक्षता म्हणून कुटुंबाचीही तपासणी होणार आहे. 

 

जिल्ह्यातील चित्र... 
आजअखेरचे बाधित- 1284 
उपचार सुरू असलेले- 560 
आजअखेर कोरोनामुक्त- 682 
आजअखेर मृत झालेले- 42 
बाधितांपैकी चिंताजनक- 40 
ग्रामीण भागातील रुग्ण- 662 
शहरी भागातील रुग्ण- 105 
महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 517 

 
तालुकानिहाय बाधितांची संख्या 
आटपाडी- 92, जत- 112, कडेगाव- 54, कवठेमहांकाळ- 33, खानापूर- 42, मिरज- 83, पलूस- 70, शिराळा- 160, तासगाव- 31, वाळवा- 90, महापालिका क्षेत्र- 517 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, 70 people, including six policemen, were infected with corona