सांगलीत दहा दिवसांत 37 कोटी वसुलीचे उद्दिष्ट; दुसऱ्या वर्षीही फटका

Sangli aims to recover Rs 37 crore in ten days; The second year also hit
Sangli aims to recover Rs 37 crore in ten days; The second year also hit
Updated on

सांगली ः गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर महसूल वसुलीवरही परिणाम झाला आहे. यंदाही त्याचा परिणाम जाणवतो आहे. गौण खनिज व जमीन महसुलाच्या 110 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आजअखेर 73 कोटी वसूल झाले आहेत. येत्या कार्यालयीन कामकाजाच्या दहा दिवसांत 37 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट महसूल यंत्रणेसमोर आहे. सलग दुसऱ्या वर्षी महसूल वसुलीला फटका बसला आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या महसूल वसुलीत गौण खनिज विभागाचाच मोठा वाटा असतो. गेल्या वर्षी या विभागाला 60 कोटींचे उद्दिष्ट होते. तर यंदा 90 कोटींचे उद्दिष्ट आहे. आज अखेर 54 कोटी रुपये वसूल झाले आहेत. जमीन महसूल वसुली अंतर्गत 20 कोटी उद्दिष्टातील 19 कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकूण 110 कोटींतील 73 कोटी म्हणजे 66 टक्के रक्कम वसुली झाली आहे. उर्वरित दहा दिवसांत 34 टक्के रक्कम वसुलीचे उद्दिष्ट आहे. 

नद्यांमधील वाळू उपसा कमी झाल्यामुळे महसुलावर यंदा मर्यादा आली आहे. उत्पन्न मिळवण्यासाठी आता दगड, मुरुमाची मोठ्या प्रमाणावर उचल करण्यावर भर आहे. वाळू लिलाव होत नसले, तरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध महामार्गांच्या कामांमुळे दगड, मुरूम उचलीतून मिळणारा महसूल मोठा आहे. त्यावरच उद्दिष्टपूर्ती अवलंबून असते. 

दृष्टिक्षेप 

  • वसुली उद्दिष्ट : 110 कोटी 
  • पैकी गौण खनिज : 90 कोटी 
  • जमीन महसूल : 20 कोटी 

जास्तीत जास्त वसुलीचा प्रयत्न
यंदाच्या महसूल वसुलीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा जोमाने काम करीत आहे. मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त वसुलीचा प्रयत्न आहे. 
- विजया यादव, उपजिल्हाधिकारी (महसूल), सांगली 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com