
-बलराज पवार
सांगली : जिल्ह्याच्या जीएसटी महसुलाने यंदा दर महिन्याला शंभर कोटींचा टप्पा कायम ठेवला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्याचा जीएसटी १३०० कोटीपर्यंत गेला आहे. यात सांगली, मिरजेचा वाटा ८८८ कोटी रुपये इतका आहे. म्हणजे जिल्ह्याच्या एकूण जीएसटी महसुलापैकी ६८ टक्के जीएसटी हा महापालिका क्षेत्र आणि मिरज तालुक्यातून गोळा होतो.