Ara grapes variety Maharashtra farmers
esakal
सांगली : कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून भारतात आलेल्या ‘आरा’ या जगातील प्रसिद्ध आणि पेटंट असलेल्या द्राक्ष वाणाचा जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात प्रवेश झाला आहे. गेल्या काही वर्षांत द्राक्ष बागायतदार बदलत्या हवामानामुळे त्रस्त (Ara 36 grapes price in Sangli) आहेत. या पार्श्वभूमीवर या वाणाकडे येत्या काही वर्षांत शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे. राज्यात नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सध्या ‘आरा ३६’ व ‘आरा ३५’ वाणाकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. जिल्ह्यात आजघडीला सुमारे ७०० एकरांत लागवड झाली आहे. उत्पादित द्राक्षांनी देशातील बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे.