

कुपवाड : आगामी विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांचा सांगली मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. तिसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांच्या विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष केला. गुलालाची उधळण करीत, दुचाकी रॅली काढून, ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली.