Khillar Cattle Exhibition at Kharsundi Atpadi
esakal
आटपाडी (सांगली) : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री. सिद्धनाथ देवाच्या पौष खिलार जनावरांच्या यात्रेनिमित्त भरवलेले खिलार जनावरांचे पशुप्रदर्शन उत्साहत पार पडले. स्पर्धेत आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या खिलार खोडाने दोन दाती गटात पहिला क्रमांक पटकावला. इतरही विविध गटांत झालेल्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.