
सांगली : माधवनगर येथील बसस्थानकासमोर असलेल्या बीअर बारच्या बंद शटरवर लाथा मारल्यावरून बारचालक व तरुणांच्या टोळक्यांत जोरदार मारामारी झाली. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात संजयनगर पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.