उद्योजक अशोक खाडे यांना सांगली भुषण पुरस्कार  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक अशोक खाडे यांना सांगली भुषण पुरस्कार 

उद्योजक अशोक खाडे यांना सांगली भुषण पुरस्कार 

सांगली - "दास' उद्योगसमुहाचे अशोक खाडे यांना यंदाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येथील विश्‍व जागृती मंडळाच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी ही माहिती दिली.

पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेल्या 22 वर्षापासून विविध मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा लौकीक मिळवून देणाऱ्या सांगलीकर व्यक्तीस या पुरस्काराने गौरवण्यात येते. 

भैय्यासाहेब परांजपे, खासदार अण्णासाहेब गोटखिंडे, गायिका आशा भोसले, राजमती आक्का पाटील, ज्येष्ठ नेते राम नाईक, स्वातंत्र्यसैनिक धोंडिरामबापू माळी, कवी सुधांशु, बुध्दीबळपटू भाऊसाहेब पडसलगीकर, कृषीभुषण प्र.शं.ठाकूर, क्रांतीअग्रणी जी.डी.लाड, प्राचार्य पी.बी.पाटील, प्राचार्य म.द.हातकणंगलेकर, उद्योजक नानासाहेब चितळे, प्रा.एन.डी.पाटील, उद्योजक रामसाहेब वेलणकर अशा अनेक दिग्गजांना आजवर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

यंदाचे गौरवमुर्ती खाडे मुळचे तासगाव तालुक्‍यातील पेड गावचे. खडतर आयुष्याशी संघर्ष करीत त्यांनी स्वतःला घडवले. चरितार्थ व शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. माझगाव डॉकयार्डमध्ये ते रोजगारासासाठी लागले. मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. याशिवाय मानसशास्त्रात त्यांनी बीए, एमफील, डॉक्‍टरेट मिळवली.

माझगाव डॉकमध्ये त्यांनी गुणवत्ता सिध्द केली. कंपनीने त्यांनी जर्मनीला पाणबुड्या बनवण्याच्या कामासाठी पाठवले. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी 1992 मध्ये नोकरी सोडली. दास ऑफशोअर, दास पेट्रोलियम सर्व्हिसेस, आबुधाबी दा इन्स्ट्रमेटेंशन, दास मरीन सेज प्रा.लि असा उद्योगसमुहाचा पसारा त्यांनी वाढवला. आज त्यांच्या विविध व्यवसायांमध्ये सुमारे तीन हजार जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. अनेक परदेश कंपन्यांसोबत त्यांचा व्यवहार आहे. नौका निर्मिती क्षेत्रातील मोजक्‍या मराठी उद्योजकांपैकी ते आहेत. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी ते कार्यरत असतात. 

Web Title: Sangli Bhushan Award Entrepreneur Ashok Khade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top