सांगली ब्रेकिंग : जिल्ह्यात 26 पैकी 24 कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

सांगली- "कोरोना' रूग्णांच्या बाबतीत दोन आठवड्यापूर्वी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्यातील 26 पैकी 24 रूग्ण "कोरोना' मुक्त झाले आहेत. त्यापैकी 22 जणांना डिस्चार्ज दिला आहे. एका बाळाला "कोरोना' असल्यामुळे त्याचे आई-वडील आणि एक महिला असे चौघेजण सध्या मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. सांगलीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी धोका पूर्ण टळलेला नसल्यामुळे दक्षता घ्यावी असे आवाहन केले जात आहे. 

जिल्ह्यात परदेशवारी करून आलेले संशयित आणि संपर्कातील अशा 1516 व्यक्ती आहेत. यापैकी 232 जणांना आयसोलेशन कक्षात दाखल करून सर्व व्यक्तींच्या स्वॅब ची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 189 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 
इस्लामपूर येथे चौघेजण सौदी अरेबियातून आल्यानंतर त्यांना "कोरोना' झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि इतर असे 26 रूग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात भितीचे वातावरण होते. या 26 रूग्णांपैकी आतापर्यंत 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दोन रूग्ण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. त्यापैकी एक बाळ असून एक महिला आहे. या बाळाचे आई-वडील बरे झाले असून ते देखील बाळाबरोबर कक्षात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत चौघेजण आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. 

तबलिगी-ए-जमात च्या संपर्कातील 7 आणि इतर 10 अशा 17 जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. तसेच सध्या संस्थात्मक क्वारंटाईन 72 जण आहेत. त्यापैकी मिरज येथे 36, इस्लामपूर येथे 26 आणि शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 जण निरीक्षणाखाली आहेत. होम क्वारंटाईन असलेल्या 1212 पैकी 646 जणांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 566 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Breaking: 24 out of 26 in the district are corona free