
सांगली : आरोग्यदायी व्यायाम म्हणून सायकलिंगकडे सांगलीकरांचा कल वाढला आहे. गावोगाव सायकल ग्रुप झाले आहेत. त्याबरोबरच आता खेळ म्हणूनही सायकलींकडे युवा पिढीचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणारे पंचवीसहून अधिक खेळाडू सांगली शहर व परिसरात आहेत. या खेळासाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेकडून ठोस प्रयत्नांची अपेक्षा आहे.