Rare wildlife sighting in Chandoli Maharashtra
esakal
पुनवत : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली जंगल सफारीदरम्यान सोमवारी (ता. १९) सकाळी साडेसहाच्या सुमारास पर्यटकांना १५ ते २० रानकुत्र्यांच्या कळपाचे दर्शन (Chandoli jungle safari wild dog sighting) झाले. एकाच वेळी मोठ्या संख्येने रानकुत्रे दिसल्याने पर्यटकांना दुर्मीळ वन्यजीव निरीक्षणाचा अनुभव मिळाला. यावेळी नॅचरलिस्ट प्रणव महाजन उपस्थित होते. काही पर्यटकांनी या प्रसंगाचे छायाचित्रणही केले.