
सांगली : तुम्ही खासगी करार करणार आहात; पतसंस्था किंवा बँकेतून कर्ज काढणार आहात आणि त्या करारासाठी १०० रुपयांचा मुद्रांक खरेदी करत असाल, तर थोडा विषय समजून घ्या. राज्य शासनाच्या १०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याच्या आणि ५०० रुपयांचे मुद्रांक सुरू करण्याच्या धोरणाचा पुरता गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेते आणि लोकांत वाद सुरू झाले आहेत.