
सांगली : विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा ७/१२ शंभर दिवसांत कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार अस्तित्वात येऊन ४० दिवस झाले. परंतु मुख्यमंत्र्यांनी अद्यापही कर्जमाफीवर भाष्य केलेले नाही. आश्वासन पूर्तीसाठी केवळ ६० दिवस बाकी आहेत.