Grape Season
Grape Seasonesakal

Grape Season : शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता 'क्यूआर कोड'; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Sangli Collector : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Farmer) व्यापाऱ्यांकडून केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on
Summary

द्राक्षाचा हंगामा (Grape Season) आता सुरू होतोय. काही ठिकाणी निर्यातीसाठीची द्राक्षे विकली जात आहेत. दिल्ली बाजारात जाणारी द्राक्षे काढली जात आहेत.

सांगली : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Farmer) व्यापाऱ्यांकडून केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीकडे नोंदणी करावी. त्यांनी व्यापाऱ्यांना क्यू-आर कोड (QR Code) द्यावा. तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (Collector Dr. Raja Dayanidhi) यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com