काँग्रेस पक्षप्रतोदांनी मांडला मोदी शहांच्या अभिनंदनाचा ठराव

काँग्रेस पक्षप्रतोदांनी मांडला मोदी शहांच्या अभिनंदनाचा ठराव
काँग्रेस पक्षप्रतोदांनी मांडला मोदी शहांच्या अभिनंदनाचा ठरावsakal
Updated on

सांगली: जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षप्रतोद जितेंद्र पाटील (Jitendra Patil) यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. देशात भाजप विरूद्ध काँग्रेस टोकाचा राजकीय संघर्ष सुरु असताना एका चांगल्या धोरणाचे कौतुक काँग्रेस नेत्याने केले.

उसाला एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास वरील रकमेवरील आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ होणार आहेच, सोबत कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल काँग्रेस पक्ष प्रतोद जितेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.

पाटील हे काँग्रेसचे आक्रमक नेते असून सातारा जिल्ह्यात कृष्णा कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या या ठरावाला राष्ट्रवादीचे सदस्य संजीव पाटील यांनी अनुमोदन दिले. या अभिनंदन ठरावाच्या निमित्ताने विकासात्मक आणि लोकहिताच्या विषयांत पक्षभेद विसरून काम केले पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Dam Supreme Court dispute
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Krishna River water level today
Nipani flyover wall collapse after heavy rain
Marathi News Esakal
www.esakal.com