
सांगली : नेहमीच वर्दळ असणाऱ्या मार्केट यार्डातील बँकेत चार दरोडेखोरांची टोळी शटर तोडून मध्यरात्री घुसली. त्यांनी प्रवेशद्वाराजवळील ‘सुरक्षा अलार्म’चा बंदोबस्त केला. तयारीनिशी आलेल्या टोळीने याआधीच ‘रेकी’ केली असावी. हालचालींवर ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे वळवले अन् बँकेत प्रवेश केला. तेवढ्यात बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काहीतरी गडबड झाल्याचा मेसेज आला.